'सिंदखेड राजा' शिक्षण परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2021

'सिंदखेड राजा' शिक्षण परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय महामंडळ सभा रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष प्रभाकर झोड (अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सभेत युग नायक पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

        यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष धनंजय उजनकर (लातूर), प्रदेश सचिव बाळासाहेब यादव (परभणी), प्रदेश प्रशिक्षण प्रमुख व प्रवक्ते पुरुषोत्तम जाधव (बीड) आदींसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सभेत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन ठराव करण्यात येणार आहेत. तरी सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी व  शिक्षकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई (गारगोटी), उपाध्यक्ष श्रीकांत पाटील (चंदगड), सचिव डी. के. देसाई (करवीर) आदींनी केले आहे.
No comments:

Post a Comment