खेडोपाडी वंचिताना ज्ञानबळ देण्याचे कार्य र. भा. माडखोलकर यांनी केले - ए. एस. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2021

खेडोपाडी वंचिताना ज्ञानबळ देण्याचे कार्य र. भा. माडखोलकर यांनी केले - ए. एस. पाटील

चंदगड येथे खेडूतचे संस्थापक र. भा. माडखोलकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनी अभिवादन करताना प्राचार्य आर.आय पाटील, प्रा. पाटील, कांबळे आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कोणताही राजाश्रय नसताना लोकाश्रयातून र. भा. माडखोलकर सरांनी खेडूत शिक्षण संस्थेच्या रोपटयाचे विशाल वटवृक्षात रूपांतर करण्याचे अविरत कार्य शेवटच्या श्वासापर्यंत केले. गरजवंताला अन्न देणे हे जसे पुण्य मानले जाते. तसे त्याला अन्न मिळविण्यासाठी शिक्षण देणे, कला देणे हा थोर उपकार समजला जातो. चंदगड तालुक्यातील शिक्षणापासून वंचित असलेल्या माणसांना ज्ञानबळ देण्याचे काम स्व. र. भा. माडखोलकर यांनी केल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य ए. एस. पाटील यांनी केले.

         खेडूत शिक्षण मंडळाचे संस्थापक चेअरमन स्व. र. भा. माडखोलकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. आय. पाटील होते.

       प्रास्ताविक प्रा. मनिषा आमणगी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय टी. टी. बेरडे यांनी करून दिला. यावेळी काही माणसांचा जन्म, त्यांना मिळालेलं आयुष्य हे समाजासाठी आवश्यक असतं. परंतु त्यांच जाणं मात्र पोकळी निर्माण करणार असतं. स्व. र. भा. माडखोलकर हे असेच एक व्यक्तीमत्व होते.' असे मत एस. व्ही. गुरबे यांनी मांडले. यावेळी सीमा कवी रविंद्र पाटील म्हणाले की, 'र. भा. माडखोलकर हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व होते. चंदगड तालुक्यातील विविध शैक्षणिक कल्पनांचे जनक शैक्षणिक प्रगतीचे शिल्पकार, आदर्श संस्थाचालक म्हणून त्यांनी आपली एक वेगळीओळख निर्माण केली.यावेळी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, एल. डी. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी ॲड. आर. पी. बांदिवडेकर, प्राचार्य एस. जी. सातवणेकर, ए. जी. बोकडे, डॉ. सुजाता सप्ले, मारूती पाटील, गुळामकर, नारायण माडखोलकर, प्रा. बी. डी. मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. आर. चिगरे यांनी तर आभार टी. एस. चांदेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment