अथर्व-दौलतचा २० रोजी मोळी पूजन कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2021

अथर्व-दौलतचा २० रोजी मोळी पूजन कार्यक्रम

कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड लिज्ड दौलत साखर कारखान्याच्या तिसऱ्या  गळित हंगामाचा शुभारंभ बुधवार दि  २० ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. या निमित्त मान्यवरांच्या हस्ते सकाळी दहा वाजता मोळी पूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. या कार्यक्रमाला सर्व शेतकरी बांधव, कर्मचारी, हितचिंतकांनी तोडणी-ओढणी वाहतूक ठेकेदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment