नांदवडे येथील संकेत पाटील याची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2021

नांदवडे येथील संकेत पाटील याची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड

संकेत पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील  महाविद्यालयातील संकेत संजय पाटील या विद्यार्थ्यांची ओडीसा चिल्का येथील राष्ट्रीय कॅम्प साठी निवड झाली आहे.मुंबई येथे एन.सी.सी. कॅम्प अंतर्गत घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये  संकेत पाटील याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याची पुढील राष्ट्रीय कॅम्पसाठी  निवड करण्यात आली आहे.

          संकेत हा नांदवडे (ता. चंदगड) येथील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे. सध्या तो विज्ञान शाखेत  तृतीय वर्षात शिकत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment