दौलत-अथर्वची एफ आर पी एकरकमी २९०१ रु देणार -मानसिंग खोराटे, तिसऱ्या गळीत हंगामास प्रारंभ, इथेनॉल प्रकल्पही लवकरच सूरू करणार - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2021

दौलत-अथर्वची एफ आर पी एकरकमी २९०१ रु देणार -मानसिंग खोराटे, तिसऱ्या गळीत हंगामास प्रारंभ, इथेनॉल प्रकल्पही लवकरच सूरू करणार

हलकर्णी: अथर्व-दौलत साखर कारखान्याच्या गव्हाणीत ऊस मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ करताना मानसिंग खोराटे, सौ. मनिषा खोराटे, गोपाळराव पाटील, श्रीपतराव शिंदे, सुनील शिंत्रे, शांताराम पाटील, सचिन बल्लाळ, प्रभाकर खांडेकर आदी.

चंदगड / प्रतिनिधी : (नंदकुमार ढेरे) 

        दौलत साखर कारखाना हा शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून बंद पडलेला दौलत साखर कारखाना चालवायला घेतला आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने येत्या तीन- चार वर्षात दौलत कारखाना जिल्ह्यात नंबर वन बनवणार आहे. आतापर्यंत कामगारांचे पगार, शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा केली आहेत. यापुढेही शेतकऱ्यांची देणी वेळेत देण्यास आपण बांधील असल्याचे सांगून यावर्षी गाळपास येण्र्याऱ्या ऊसाला प्रतिटन २९०१ रु. एकरकमी देणार असल्याचे अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी जाहीर केले. 

बैलगाडी काट्यावर आलेल्या शिवाजी तुकाराम पेडणेकर यांच्या पहिल्या बैलगाडीचे पूजन करताना अध्यक्ष मानसिंग खोराटे, सौ. मनिषा खोराटे, माजी सभापती शांताराम पाटील आदी. 

     ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील होते.

       खोराटे पुढे म्हणाले, ``यावर्षी इथेनॉल प्रकल्प हाती घेतला आहे. पुढील काळात वीजनिर्मिती प्रकल्पाचा मानस आहे. त्यासाठी शेतकरी, कामगार यांच्या सहकार्याची गरज आसल्याचे  सांगितले.``

      गोपाळराव पाटील म्हणाले, ``अथर्व कंपनीने दौलत सुरू करून खुप मोठे सहकार्य येथील शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे कारखाना सुस्थितीत चालवण्यासाठी आता शेतकरी आणि कामगारांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. श्रीपतराव शिंदे यांनी दौलत व आजऱ्या पाठोपाठ गोडसाखरही सुरू होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

     यावेळी ॲड. संतोष मळविकर म्हणाले, ``तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व कारखान्याच्या विविध प्रकल्प मंजुरीसाठी हलकर्णी ग्रामपंचतीच्या सहकार्याची गरज आहे. विनाकारण नको त्या गोष्टीचा तगादा न लावता ग्रामपंचायतीने सहकार्य करावे. ग्रामपंचायतीची देणी असतील पण केवळ हेकेखोर पणासाठी तालुक्याची आणि शेतकऱ्यांची गळचेपी करू नये अन्यथा ग्रामपंचायतीला तालुक्याच्या रोषाला सामोरे जावे लागले असे सांगितले.

       यावेळी प्रा. सुनील  शिंत्रे यांनी दौलत, हेमरस व इको- केन बरोबरच आजरा कारखान्याला हि शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रभाकर खांडेकर म्हणाले `याआधी काय घडलं? यापेक्षा यापुढे कारखाना सुरू राहील हे महत्वाचे आहे. इतर कारखान्याप्रमाणे ऊस दर मिळावा. शेतकऱ्यांना कारखान्याचे आणि कारखान्याला शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे असे सांगितले.

    यावेळी शांताराम पाटील, संभाजी शिरोलीकर, विजयभाई पाटील, अनिल शिवणगेकर, अशोकराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.

       कार्यक्रमाला जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, विद्या पाटील, उपसभापती मनीषा शिवणगेकर, पृथ्वी खोराटे, राजू शिवणगेकर, गोविंददादा पाटील, शिवाजी हसबे, शिवाजी तुपारे, सुनील काणेकर, नामदेव पाटील, संजय पाटील, महादेव कांबळे, दिलीप चंदगडकर आदींसह विविध गावचे सरपंच, शेतकरी, पदाधिकारी, कामगार उपस्थित होते. स्वागत अनिल काटे यांनी केले. अनंत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विनया गावडे यांनी केले. आभार मनोहर होसुरकर यांनी मानले.


दौलत-अथर्वच्या तिसर्‍या हंगामात पहिल्या दिवशी काठ्यावर आलेल्या नामदेव भुजबळ, संजीव जोशी, नितीन जाधव, परशराम पाटील (बैलगाडी छकडा), शिवाजी पेडणेकर, उत्तम राऊत, मल्लाप्पा नाईक (बैलगाडी), अनिल दिवटे, अमृत गावडे, इदमुबारक नाईकवाडी(ट्रॅक्टर), अश्विनी चवलगी, अतिक पल्ला, कोणेरी बेळगावकर (ट्रॅक) या वाहनचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment