ग्रंथ आत्म्यातील अंधःकार दूर करतात! - कवी चंद्रकांत पोतदार - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2021

ग्रंथ आत्म्यातील अंधःकार दूर करतात! - कवी चंद्रकांत पोतदार

वाचनालय पदाधिकाऱ्यांकडे ग्रंथसंपदा प्रदान करताना कवी चंद्रकांत पोतदार सोबत सरपंच उपसरपंच आदी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         चांगल्या पुस्तकांचे वाचन व थोरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून युवा पिढीने कार्यरत राहावे. कारण ग्रंथच आत्म्यातील अंधःकार दूर करतात. असे विचार ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी व्यक्त केले. ते कालकुंद्री ता. चंदगड येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात  ग्रंथदान कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच छाया जोशी होत्या.

           स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष के जे पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील वाचन संस्कृती वाढविण्याच्या पवित्र हेतूने डॉ. पोतदार यांनी ज्ञानदीप वाचनालयास पन्नास ग्रंथ- पुस्तके देणगी स्वरूपात सुपूर्द केली.  उपसरपंच संभाजी पाटील यांच्या हस्ते पोतदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अझरुद्दीन शेख, प्रशांत मुतकेकर यांच्यासह लोकळू पाटील, उदय सुतार, नरसू कांबळे व कार्यकारी मंडळ उपस्थित होते. आभार ग्रामपं. सदस्य विलास शेटजी यांनी मानले.

No comments:

Post a Comment