चंदगड तालुका ग्रामपंचायत कामगार संघाच्या वतीने ग्रामपं कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय मेळावा व कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक भवन नेसरी रोड, कोवाड येथे शनिवार २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष परशराम जाधव यांनी दिली.
सरपंच अनिता भोगण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह जि प सदस्य कल्लाप्पाणा भोगण, सौ विद्या पाटील, पं स सदस्या नंदिनी पाटील, उत्साळी च्या सरपंच माधुरी सावंत-भोसले, प्राआ. केंद्राचे डॉ प्रसन्न चौगुले, कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे व रविंद्र कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या परिसरातील आशा, अंगणवाडी सेविका/ मदतनीस, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन संघटना अध्यक्ष परशराम जाधव, उपाध्यक्ष तानाजी वाईंगडे व संजय दळवी, सरचिटणीस एकनाथ राघोजी, संघटक नामदेव गावडे आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment