रक्तदान शिबीर प्रसंगी बोलताना वेल्फेअर फाउंडेशनचे मार्गदर्शक तजम्मुल फणीबंद
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा (नंदकुमार ढेरे)
ईद-ए-मिलादुन्नबी चे औचित्य साधून तजम्मुल फणीबंद वेल्फेअर फाउंडेशन मार्फत चंदगड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन नगरसेवक मेहताब नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
यावेळी तजम्मुल फणीबंद वेल्फेअर फाउंडेशन चे मार्गदर्शक तथा अंजुमन--ए--इस्लाम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तजम्मुल फणीबंद यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या मानवतावादी संदेशाची शिकवण ही एका विशिष्ट समाजासाठी किंवा धर्मासाठी नसुन ही संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आहे याचाच एक भाग म्हणून रक्तदान करून गरजू रुग्णांचे जीवन वाचवू शकतो व नकळतपणे फार मोठे पुण्यं कार्य करु शकतो असे सांगितले.
शिबीरावेळी बोलताना नगरसेवक अभिजित गुरबे. |
नगरसेवक अभिजीत गुरबे यांनी वेल्फेअर फाउंडेशन च्या माध्यमातून मुस्लिम समाजातील युवक एकत्र येऊन आयोजित केलेल्या शिबीराची प्रशंसा करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कांबळे, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनीही मनोगत व्यक्त केली. हाजी मजीद अत्तार, कलीम मदार, अंजुमन--ए--इस्लाम चे संचालक झाकीर अब्दुल सत्तार नाईक, संचालक इस्माईल शहा, संजय मुळीक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,. उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व ऍड. रवी रेडेकर यांनी सदिच्छा भेट दिली.
आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बॅंक, गडहिंग्लज यांच्या वतीने डॉ.सुभाष पाटील, राजू कुंभार, शितल डोंगरे व कर्मचारी यांनी रक्त संकलन केले. तजम्मुल फणीबंद वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष आरीफ खेडेकर, उपाध्यक्ष इब्राहिम फणीबंद, अन्वर मुल्ला, जुबेर पटेल, अस्लम नाईक,अलफाज नाईक, इम्रान नाईक,जावेद पटेल, आसिफ मुजावर,परवेझ मुल्ला,फरदीन नेसरीकर व इतर संचालक यांनी विशेष परिश्रम घेतले,. सुत्रसंचालन जमीर आगा यानी केले तर आरीफ खेडेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment