राष्ट्रीयकृत, शेड्युल व सहकारी बँकांनी बेरोजगार तरुणांना सहकार्य करण्याची सकल मराठा समाजाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2021

राष्ट्रीयकृत, शेड्युल व सहकारी बँकांनी बेरोजगार तरुणांना सहकार्य करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

तहसिलदार विनोद रणावरे यांच्याकडे निवेदन देताना समन्वयक प्रा. दीपक पाटील, भरत पाटील व कार्यकर्ते

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

    आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणाना राष्ट्रीयकृत, शेड्युल व सहकारी बँकांनी सहकार्य करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार विनोद रणावरे यांच्याकडे सकल मराठा समाजामार्फत समन्वयक प्रा. दीपक पाटील यांनी दिले.

        त्याचबरोबर चंदगड तालुक्यामध्ये असणाऱ्या राष्ट्रीयकृत , शेडयुल्ड आणि सहकारी बँकामध्ये १ एप्रिल २०२१ पासून शाखानिहाय आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत किती प्रकरणांची मागणी केली , त्यामधील किती मंजूर केली याबाबत तपशील द्यावा तसेच सकल मराठा समाजातील प्रमुख मंडळी व बँक अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन आपल्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रा. दीपक पाटील,गोविंद पाटील,पांडुरंग बेनके, गणपती तुळस्कर, अरुण पाटील, भरत गावडे, राजू पाटील, निवृत्ती हारकारे, जनार्दन देसाई आणि प्रताप डसके  यांनी केली आहे.

         आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणापर्यंत सदर योजना पोहचवून त्यांना सक्षम बनविणे, रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व आर्थिकदृष्ट्या मागास घटकाचा सामाजिक विकास घडवून आणणे हा या योजनेचा अर्थ अभिप्रेत आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी कर्ज मंजुरी करणे गरजेचे आहे. पण काही बँका कर्ज प्रकरण करण्यामध्ये उदासीन आहेत किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. बेरोजगार तरुनांना बँकाकडे हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे ते निराश होऊन वैफल्य ग्रस्त झाले आहेत. याबाबत अनेक बेरोजगार तरुणांच्या तक्रारी आहेत. कागल तालुक्यामध्ये एका तरुणाने नैराश्यातून आपले जीवन संपविले. त्यामुळे आपण वेळीच जागृत होऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले.

1 comment:

Unknown said...

मराठा समाजाच एकत्र येत नाही हीच शोकांतिका आहे. तसेच ज्या बॅंका या योजनेला मदत करत आहेत हे या चॅनेल ला दिसत नाही.

Post a Comment