माणगाव ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकाऱ्यावर कारवाईसाठी आमरण उपोषणाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2021

माणगाव ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकाऱ्यावर कारवाईसाठी आमरण उपोषणाचा इशारा


माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

         माणगाव (ता. चंदगड) या गृप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महादेव भाऊ दोरूगडे यानी शासन आदेशांचे पालन न केल्याने त्यांच्यावर शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी येथील राजाराम गुंडाप्पा बागडी यानी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांचेकडे केली आहे.

   माणगाव ग्रामपंचायतीकडे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी महादेव दोरूगडे यानी वरीष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळूनही येथील भखंड क्र .१०६ वरील बांधकामावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५२ व प्रचलित नियमानुसार नियंत्रण न ठेवल्यामुळे भुखंड धारकाने विनापरवाना बांधकाम केले. याला ग्रामविकास अधिकारी जबाबदार असून याचा संबधीताकडून गटविकास अधिकारी चंदगड यानी खुलासा मागविला होता. पण तो प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषद (शिस्त वअपिल) १९६४ मधिल तरतुदिनुसार व प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याचा आदेश देण्यात येऊनही कारवाई होत नसल्याने या विरोधात उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment