वनीकरणाबरोबरच पाण्याचे व वन्यजीवांचे संरक्षण करा - प्रभारी वनक्षेत्रपाल डॉ. सागर पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2021

वनीकरणाबरोबरच पाण्याचे व वन्यजीवांचे संरक्षण करा - प्रभारी वनक्षेत्रपाल डॉ. सागर पाटील

हडलगे येथे ग्रामस्थांना वन्य जीव सप्ताहानिमित्य आयोजित कार्यकृमात मार्गदर्शन करताना प्रभारी वनक्षेत्रपाल डॉ. सागर पाटील.


तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

          प्लॅस्टिकच्या प्रचंड  वापरामुळे  पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. सामाजिक वनीकरणाबरोबरच पाण्याचे तसेच वन्यजीवांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे विचार सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लज चे प्रभारी वनक्षेत्रपाल डॉ. सागर पाटील यांनी केले.

        हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे स्वातंत्र्यांचा अमृतमोहत्सव व  दि .४ ते १० ऑक्टोबर आयकॉनिक विक निमित्य आयोजित कार्यक्रमात डॉ. सागर पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. लता पाटील होत्या.

      डॉ. पाटील पुढे बोलताना म्हणाले, ``महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामस्थांनी सामाजिक वनीकरण विभागामार्फत गट लागवड, बांधावरील वृक्षलागवड अशी पर्यावरण पूरक कामे घेवून रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी. पर्यावरण वाचले तरच आपण वाचू असे सांगून ग्रामस्थांना या पर्यावरण संतुलिनाचे काम करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची हरित प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमाला  बसवराज कुरबेटी (वनसेवक), रामचंद्र पाळेकर (वनसेवक), मनोज पाटोळे,  हडलगेचे सरपंच सौ. लता पाटील, उपसरपंच तुकाराम पाटील, ग्रामसेवक  पी. एम्. कुंभार,  संजय पाटील  ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment