अर्जुनवाडीत रविवारी १६०० मिटर धावणे स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2021

अर्जुनवाडीत रविवारी १६०० मिटर धावणे स्पर्धा


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे रविवार दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता १६०० मिटर धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

    शिवप्रेमी गृपच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धा शिवप्रेमी चौक अर्जुनवाडी येथून सुरू होणार आहेत. यासाठी अनुक्रमे  ३ हजार १, २ हजार १, १५०१, १00१, ७०१, ५०१ , ३०१ , २५१ व १०१ अशी अनुक्रमे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी या स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन अर्जुनवाडी ग्रामस्थ व शिवप्रेमी गृपच्या वतीने करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment