जिल्हा बॅक निवडणूकीत कार्यकर्त्याना सन्मान मिळेल असा निर्णय घेणार - भरमूआण्णा पाटील, पाटणे फाटा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2021

जिल्हा बॅक निवडणूकीत कार्यकर्त्याना सन्मान मिळेल असा निर्णय घेणार - भरमूआण्णा पाटील, पाटणे फाटा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे जिल्हा बॅक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी मंत्री भरमुआण्णा पाटील

चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे) 

      जिल्ह्यात कार्यकर्ते विकत घेऊन राजकरण सूरू आहे,पण विकत घेतलेल्या कार्यकर्त्यांवर किती दिवस राजकरण करणार.एक दिवस आज विकत घेतलेले कार्यकर्ते उद्या दुसरे कोण तरी विकत घेणारच.त्यामुळे असे राजकरण किती दिवस चालणार, राजकरणात निष्ठावंत कार्यकर्त्या घडवावा लागतो,त्याच्या कर्तृत्वारच राजकरणाची दिशा ठरत असते. निवडणूक येतील जातील पण कार्यकर्ता ताठ मानेने उभा राहिला पाहिजे असे सांगून येणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांला मान मिळेल असाच निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनी केले 

     पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे जिल्हा बॅक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी शामराव बेनके होते. प्रारंभी प्रास्ताविक अनिल शिवनगेकर यानी करून मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला.

     भरमुआण्णा पुढे म्हणाले गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला थोडक्यात पराभव पत्करावा लागला. मतदारसंघात फिरू शकलो नाही, वेळ देऊ शकलो नाही याचा फटका बसला. पण ज्यांना संस्था काढून दिल्या त्या लोकांनी पाठ सोडली याची खंत त्यांनी बोलून दाखवली. कार्यकर्त्यांच्या कल्पनेतून अनेक योजना राबविल्या, कार्यकर्त्यांच्या कष्टातूनच मंत्रीपद मिळाले.त्यांच्या जीवावरच राजकरणात टिकून आहे.राजकरणात नितीमत्ता नसेल तर जगण्याला अर्थ नाही. आजपर्यंत सर्वसामान्यांसाठी काम केलं गरीबतल्या गरीब माणसानं साथ दिली. पाटबंधारे, दूध व्यवसाय, दूध संस्था, जिल्हापरिषद योजना यांच्या माध्यमातून गरीब माणसाला वर आणण्यासाठी प्रयत्न केला. 

            यावेळी माजी सभापती शांताराम पाटील यानी कोणत्याही परिस्थितीत केडीसीसी बँकेची निवडणूक लढवून काही जागा तरी आपल्या गटाला मिळाव्यात. तसेच एकदा उमेदवारी घेतली की माघार घ्यायची नाही अशी आग्रही भूमिका मांडली.तर भरमुअण्णा जो निर्णय घेतील त्याच्या बरोबर जायचा विश्वास यावेळी अन्य मंडळींनी व्यक्त केला.जि.प सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती ज्योतीला पाटील,  प्रताप सूर्यवंशी, नाना डसके, आर.जी. पाटील, मायाप्पा पाटील, अप्पाराव गिलबिले, उदयकुमार देशपांडे,माजी सभापती यशवंत सोनार, नामदेव कांबळे, डॉ नंदकुमार गावडे,प्रा.व्हि.के गावडे, नगरसेवक दिलीप चंदगडकर, शामराव बेनके यांनी मनोगते व्यक्त केली.

       यावेळी गोकूळचे माजी संचालक दीपक पाटील, मोहन परब, नगरसेवक सचिन नेसरीकर, पुंडलिक कदम, केदारी सांवत, बाळु पाटील, कल्पना पाटील, रुक्माना देसाई, आप्पाजी वर्पे, विलास शेटजी, बारकू दळवी, विलास पाटील आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.आभार अशोक कदम यांनी मानले.

 


No comments:

Post a Comment