चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात लसीकरण मोहीम, महाराष्ट्र शासनाचा 'मिशन युवा स्वास्थ्य अभियान' उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2021

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात लसीकरण मोहीम, महाराष्ट्र शासनाचा 'मिशन युवा स्वास्थ्य अभियान' उपक्रम

मिशन युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात लसीकरण करण्यात आले. यावेळी प्राचार्यप्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. एस. एम. पाटील व इतर. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        उच्च व तंत्र शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित "मिशन  युवा स्वास्थ्य अभियान" (कालावधी दि. २५ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर २०२१) या उपक्रमांतर्गत र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना  विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने "कोविड-१९ लसीकरण शिबिर" आयोजित करण्यात आले. 

         सदर लसीकरण शिबीरात महाविद्यालयातील ७२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ६६ विद्यार्थी पहिला डोस व ६ विद्यार्थ्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात आला. या अभियानांतर्गत महाविद्यालयाच्या प्रथम व दुसरा डोस घेतलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांचा ही सर्वे करण्यात आला. ९२३ विद्यार्थ्यांनी पहिला व ३७ विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेल्याची माहिती मिळाली.  उर्वरीत कांही  विद्यार्थ्यांची माहिती जमा करणे सुरू आहे.

        महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व शिवाजी विद्यापीठाचे कोल्हापुर जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील व क्रीडा अधिकारी प्रा. एस. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाचा सर्व स्टाफ यासाठी कसोसिने प्रयत्नरत आहे.  न. भु. पाटील ज्युनियर काॅलेजचे प्राचार्य आर. आय. पाटील व त्यांचा सर्व स्टाफच, रा. से. योजनेच्या स्वयंसेवकांचे या कामी उत्तम सहकार्य मिळाले आहे. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदगड यांचे वेळोवेळी कॅम्प आयोजनसाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. 

No comments:

Post a Comment