मोरेवाडी येथे रविवारी स्मारक वास्तूशांती, मूर्ती अभिषेक व रक्तदान शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2021

मोरेवाडी येथे रविवारी स्मारक वास्तूशांती, मूर्ती अभिषेक व रक्तदान शिबीराचे आयोजन

तेऊरवाडी / एस. के. पाटील

        मोरेवाडी (ता. चंदगड) येथे ह. भ. प. वै. कृष्णा कुराडे यांच्या प्रथम पुण्यतिथी सोहळ्यानिमित्य स्मारक वास्तूशांती, मुर्ती अभिषेक व सत्यनारायण महापुजेचे आयोजन  रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. यानिमित्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन लक्ष्मण कुराडे व सौ. चंद्रभागा कुराडे व स्मारक समिती मोरेवाडी यांनी केले आहे. 

           या निमित्य रविवारी सकाळी ८ वाजता विठ्ठल रखुमाई मंदिरात सत्यनाराण महापूजा होणार आहे. तर त्यानंतर लगेच मुर्तींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच वेळी मराठी विद्यामंदिरच्या प्रांगणात रक्तदानाचा कार्यक्रम अण्णासाहेब गळतगे ब्लड बँक गडहिंग्लज यांचेकडून होणार आहे. १० नंतर शिवकुमार स्वामी यांच्या मंत्रोच्चारात होम, मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक होणार नंतर ध्वजपूजन, तुळस पुजन, गाथा पूजन व दिपप्रज्वलन होऊन दुपारी १ नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दुपारी सांप्रदायिक दिंडयाचे भजन तर सायंकाळी हरिपाठ व रात्री अरुण पोवार (तळाशी, राधानगरी) यांचे किर्तन होणार आहे. याबरोबरच दुपारी अनिल कुराडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमही होणार आहे. या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन स्मारक समितीने केले आहे.

No comments:

Post a Comment