बोंजुर्डी येथील संगीत भजन स्पर्धेत कुरुकलचे श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2021

बोंजुर्डी येथील संगीत भजन स्पर्धेत कुरुकलचे श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ प्रथम

बोंजुर्डी (ता. चंदगड) येथील भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस स्विकारताना कूरूकली ता.कागल येथील विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळातील कलाकार 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         बोंजुर्डी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थ मंडळा मार्फत आयोजीत केलेल्या खुल्या संगीत भजन स्पर्धेत कुरुकली (ता. कागल) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. तर अडकूर (ता. चंदगड) येथील श्री रवळनाथ बाल भजनी मंडळाने दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकावले. संत तुकाराम भजनी मंडळ हूंबरवाडी, मरगुबाई भजनीमंडळ माणगाव, श्री भावेश्वरी भजनी मंडळ पोरेवाडी, श्री भैरवनाथ भजनी मंडळ सावर्डे या भजनी मंडळांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. स्पर्धेत उत्कृष्ट तबला वादक दिपक गावडे (हुंबरवाडी), उत्कृष्ट मृदंग वादन चंद्रदीप भातकांडे ( इब्राहिमपूर), उत्कृष्ट हार्मोनिअम नंदु केसरकर (हलकर्णी), उत्कृष्ट गायन अंकीता शेटके (कुरुकली) या स्पर्धकांची  निवड करण्यात आली. या भजन स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच आण्णासाहेब देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ वारकरी ह. भ. प. नारायण सटुप्पा पाटील यांना १०१ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल पाद्य पूजा करण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण १७ संघानी सहभाग घेतला होता. विजयी स्पर्धकांना सुधीर हणमंत पाटील, प्रविण गुडवळेकर, अविनाश भादवणकर, हरीबा सुतार, शशिकांत वाईंगडे, अशोक जाधव, विजयकुमार कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धा पार पाडण्यासाठी जोतिबा पाटील, पुंडलिक पाटील, प्रतिक पाटील, अनिकेत पाटील, सुधीर बाईंगडे, पुंडलिक भिकले यांनी परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून श्रीकांत सुळेभावकर व सयाजी सुतार यांनी काम पाहीले.

No comments:

Post a Comment