विद्या पाटील यांनी केले कालकुंद्री येथील माहेरचे वाचनालय समृद्ध! वाचा सविस्तर....... - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2021

विद्या पाटील यांनी केले कालकुंद्री येथील माहेरचे वाचनालय समृद्ध! वाचा सविस्तर.......

वाचनालय पदाधिकाऱ्यांकडे पुस्तके सुपूर्द करताना विनायक पाटील.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन पार पडला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

        या दिनाचे औचित्य साधून श्री सरस्वती विद्यालयाचे माजी प्राचार्य जी. एस. पाटील यांची कन्या सौ. विद्या अविनाश पाटील (पुणे) यांनी  कु. आकांक्षा व कु. यश या आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या माहेर गावातील ज्ञानदीप वाचनालयास ५ हजार रुपये किमतीची दर्जेदार पुस्तके भेट दिली. विद्या यांचे बंधू विनायक गुंडू पाटील यांनी वाचनालय पदाधिकाऱ्यांकडे हे ज्ञानभांडार सुपूर्द केले. 

       स्वागत के. जे. पाटील  व एस्. एस्. खवणेवाडकर  यांनी केले. यावेळी बोलताना प्रा.डॉ. व्ही. आर. पाटील म्हणाले विद्या पाटील यांचा पुस्तके  भेट देऊन माहेरचे वाचनालय समृध्द करणारा उपक्रम इतरांना नक्कीच अनुकरणीय असून याचा उपयोग वाचन चळवळ व सामाजिक ज्ञानकक्षा उंचावण्यासाठी निश्चितच होईल. यावेळी भरमू तातोबा पाटील, ग्रा.पं. सदस्य विलास शेटजी, युवराज पाटील, लोकळू पाटील, दिलीप पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते. आभार पी. एस्. कडोलकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment