पेट्रोल पंपावर डिझेल भरून पैसे न देताच परराज्यातील कारचालक पसार, कोठे घडली घटना, वाचा......... - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2021

पेट्रोल पंपावर डिझेल भरून पैसे न देताच परराज्यातील कारचालक पसार, कोठे घडली घटना, वाचा.........

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कानूर खूर्द (ता. चंदगड) येथील साईपूजा पेट्रोल पंपावर चार चाकी गाडीत डिझेल घालून पैसे न देताच चालक पसार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता घडली. त्यामुळे आता इंधन दरवाढीच्या काळात फुकट इंधन घेऊन पळ काढण्याचे प्रकार समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

       शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान एक परराज्यातील (गाडी क्रमांक AP 25 P 6969) पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील कानुर खु. नजीक असलेल्या साई पूजा पेट्रोल पंपावर आली. त्यांनी  दिड हजारांचे डिझेल घेतले. क्रेडिट कार्डाद्वारे पैसे देणार असल्याने कर्मचारी स्वॅप मशीन आणण्यासाठी केबिनच्या दिशेने जात असताना स्विप्ट चालकाने पळ काढला. पैसे न देताच गाडी चालकाने पळ काढल्याने आपली फसगत झाल्याची जाणीव होताच पेट्रोल पंप मालकांनी त्या गाडीचा नागणवाडी पर्यंत पाठलाग केला. मात्र गाडी पसार झाली. 

No comments:

Post a Comment