कालकुंद्री येथे रस्सीखेच व बैलगाडी शर्यतीचा थरार - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2021

कालकुंद्री येथे रस्सीखेच व बैलगाडी शर्यतीचा थरार

रस्सीखेच स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना विजेत्या संघाचे खेळाडू.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
  कालकुंद्री (ता. चंदगड) येथील अचानक तरुण मंडळ, यादव गल्ली अ आयोजित रस्सीखेच व माणसाने बैलगाडी ओढण्याच्या शर्यतीचा थरार शौकिनांनी अनुभवला. येथील कलमेश्वर मंदिर परिसरात झालेल्या रस्सीखेच स्पर्धेतील थरारक अंतिम लढतीत गावातील सुभाष गल्लीने यादव गल्ली 'अ' वर विजय मिळवला. तानाजी गल्ली तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. रस्सीखेच स्पर्धेत १५ संघानी भाग घेतला होता. स्पर्धेसाठी पंच म्हणून दूधाप्पा पाटील, भावकू पाटील, विठोबा पाटील, पुंडलीक जोशी यांनी काम पाहिले.
   माणसाने छकडा गाडी ओढण्याची शर्यतही अटीतटीची झाली. यात दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी १३ आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यातील विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक संकेत पाटील (ओढलेले अंतर ५८१ फुट), याशिवाय बजरंग पाटील, महेश कोकितकर, गुंडू पाटील, कल्लाप्पा पाटील, दिग्विजय पाटील, संदीप कांबळे, भरत मंगुरकर, किरण कोकितकर, राहुल पाटील, सुमित पाटील, अजय मुतकेकर, पराग वर्पे यांनी यश मिळविले तर लकी नंबरचे मानकरी कृष्णा हनमंत पाटील (वय- ७० वर्षे) हे ठरले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण एम जे पाटील, अरविंद सोनार, आवान्ना  गडकरी, योगेश कदम, हरीश मुतकेकर, सुनील कदम, विनोद पाटील, नारायण जोशी आदींच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अचानक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment