इसापूर शाळेचे शिक्षक मस्कर यांच्या शैक्षणिक साधनास राष्ट्रीय पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2021

इसापूर शाळेचे शिक्षक मस्कर यांच्या शैक्षणिक साधनास राष्ट्रीय पुरस्कार

 

जोतिबा मारुती मस्कर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद  (एनसीईआरटी) नवी दिल्ली यांच्या वतीने नुकतीच २५ वी बालकांसाठी ई शैक्षणिक साहित्य  बनवणे (all India Children's educational audio, video festival) स्पर्धा घेतली होती. यातील व्हिडिओ गटात सहभागी देशभरातील ७५० स्पर्धकांतून विद्यामंदिर इसापूर (ता. चंदगड) या दुर्गम व डोंगराळ भागातील शाळेचे अध्यापक जोतिबा मारुती मस्कर ( नागरदळे, ता. चंदगड) यांच्या शैक्षणिक साधनास  'Individual  excellence award' बहुमान प्राप्त झाला. 
एनसीईआरटी कडून मस्कर यांना मिळालेले राष्ट्रीय सन्मान चिन्ह

        याबद्दल त्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. प्राथमिक शिक्षक मस्कर यांच्या अभूतपूर्व यशामुळे चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील शिक्षकही राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावून शकतात हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांचे यश सर्व शिक्षकांना दिशादर्शक ठरेल. त्यांना याकामी इसापूर ग्रामस्थ, विद्यार्थी, तालुक्यातील शिक्षक व पंस. शिक्षण विभागाचे प्रोत्साहन लाभले.


No comments:

Post a Comment