माणगांव येथे वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य विद्यार्थ्याना गणवेश व शाळेला पुस्तके दिली भेट - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2021

माणगांव येथे वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य विद्यार्थ्याना गणवेश व शाळेला पुस्तके दिली भेट

शालेय ग्रंथालयाला पुस्तके भेट देताना जयवंत कांबळे व  सरपंच अश्वीनी कांबळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       माणगांव (ता. चंदगड) येथे कै. वैजनाथ फकिरा कांबळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्य श्री.छ. शिवाजी हायस्कूल माणगावच्या गरिब विद्यार्थ्याना मोफत गणवेशाचे व शाळेला ग्रंथालयासाठी पुस्तकाचे वितरण माणगावच्या सरपंच सौ. अश्वीनि कांबळे, जयवंत कांबळे व यशवंत यानी केले.

      आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रात घालवलेल्या, आमदार राजेश पाटील यांचा अत्यंत विश्वासू सेवक व नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेची धूरा सांभाळलेल्या वैजू कांबळे यांचे गेल्या वर्षा अचानक निधन झाले. ते संपूर्ण चंदगड तालूक्याला वैजू मामा म्हणून परिचित होते. संपूर्ण आयूष्य शिक्षण क्षेत्रामध्ये घालवलेल्या या वैजू मामांचे प्रथम पुण्यस्मरणही वेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय मुलगा जयवंत, यशवंत व सुन माणगावच्या सरपंच सौ. अश्वीनी कांबळे यानी घेतला. त्यानुसार आज शाळेला चार हजारांची पुस्तके व गरीब विद्यार्थ्याना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी पं. स. माजी सभापती बंडू चिगरे, उपसरपंच बाबूराव दुकळे, तंटामुक्त अध्यक्ष जयवंत सुरूतकर, सा. कार्यकर्ते शिवाजी फडके, अशोक होनगेकर, मुख्याध्यापक के. बी. नाईक, पी. वाय. पाटील, टि. एल. तेरणीकर आदी मान्यवर ग्रामस्थ व विद्यार्थी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment