हलकर्णी येथील कारखाना (संग्रहित छायाचित्र) |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यानी सन २०२१-२२ च्या गळीत हंगामाची सुरवात केली आहे. गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी त्यांनी एक रक्कमी एफ. आर. पी देण्याचे जाहीर केलेले आहे. मात्र अथर्व संचलित दौलत शेतकरी साखर कारखान्याचे प्रमुख मानसिंग खोराटे यांनी मात्र अद्याप एफ.आर.पी देण्यासंदर्भात कोणतीच वाच्यता केलेली नाही. श्री. खोराटे यानी इतर कारखान्या प्रमाणे एफ. आर. पी. एकरक्कमी देण्याचे जाहीर करून चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी हलकर्णी गावचे सरपंच राहुल गावडे यांनी पत्रकातून केली आहे.
पूर्वी प्रमाणे एफ. आर. पीचे तुकडे करून न देता शासनाच्या अधिनियमानुसार शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्या पासून १५ दिवसांत एकरक्कमी एफ. आर. पी द्यावी लागते. त्याप्रमाणे ती जाहीर करावी. तालुक्यातील शेतकरी उत्पादक सभासदांना आपली दौलत सुरु राहावी यासाठी गेली दोन वर्ष एफ.आर.पी रक्कमेकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता तरी अथर्वचे प्रमुख मानसिंग खोराटेयांनी या सर्व बाबी लक्षात घेऊन या चालू हंगामातील एफ. आर. पी रक्कम एकरक्कमी देण्याचे त्वरित जाहीर करावे, अशी मागणी सरपंच राहुल गावडे यांनी केली आहे.
सरकारी नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना देय असलेली एफआरपी देणारच. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात अथर्व व्यवस्थानावर विश्वास ठेवून सर्व ऊस दौलत-अथर्वला पाठवावा असे आवाहन चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले.
No comments:
Post a Comment