जगात आईच महान आहे - कवी डॉ. चंद्रकांत पोतदार - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2021

जगात आईच महान आहे - कवी डॉ. चंद्रकांत पोतदार

माणगाव येथे आई विषयावर बोलताना कवी डॉ. चंद्रकांत पोतदार

माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

      वात्सल्य, प्रेम व कारुण्याचा संगम म्हणजे आई. संपूर्ण विश्वाची जननी आई असून जगण्याचा आदर्श निर्माण संस्कारी आई आज खूप महत्वाची आहे. जगण्याचे तत्वज्ञान आईच आपल्याला देते. दुसऱ्यासाठी स्वत:च आयुष समर्पित करणारी कष्टप्रद आई जगात महान, आदर्श आहे असे प्रतिपादन हलकर्णी महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक व कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. माणगांव (ता.चंदगड) येथील नवरात्रोत्सव  व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कामाना पिटुक होते.

             प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सचिन पिटुक  यांनी केले. पाहुण्याचे स्वागत मारुती चिचंणगी, अशोक चिंचंणगी यांनी केले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर बाबू नरी, तुकाराम चिचंणगी यांच्यासह ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जुन नरी यांनी केले तर आभार  युवराज रोड यांनी मानले.

No comments:

Post a Comment