अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी मानसिक आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2021

अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी मानसिक आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर



अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

             प्राथमिक  आरोग्य केंद्र अडकूर (ता. चंदगड) येथे गुरुवार दिनांक २१ ऑक्टोंबर २०२१ सकाळी ९ ते दुपारी एक वाजेपर्यंत मानसिक आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

        सदरील शिबिरामध्ये तपासणीसाठी कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध मानसिक आरोग्य तज्ञ डॉक्टर कुलकर्णी मॅडम हे स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व औषधोपचार करणार आहेत. या शिबिरामध्ये मानसिक आरोग्य रुग्ण सर्वसाधारणपणे  चिडचिडपणा करणारे, घरातून न सांगता एकटेच निघून जाणे, रात्री झोप न लागणे, एखाद्या व्यक्तीवर वारंवार संशय घेणे, सतत भांडण करणे, एखाद्या व्यक्तीवर मारण्यासाठी धावणे इत्यादी लक्षणे असणाऱ्या रूग्णावर उपचार करण्यात येणार आहेत. ज्या व्यक्तींना मानसिक आरोग्य ची वरीलप्रमाणे लक्षणे आहेत किंवा एखाद्या व्यक्तीची मानसिक आरोग्य तज्ञाकडे औषधोपचार चालू आहे. किंवा एखाद्या व्यक्तीची धारवाड व रत्नागिरी येथील मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचार चालू आहे अशा सर्व रुग्णांनी वरील दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या शिबिराचा लाभ घ्यावा.

            या शिबिरामध्ये मानसिक आरोग्य तज्ञांकडून तपासणी करून औषधोपचार केला जाणार आहे व त्या रुग्णांना प्रत्येक महिन्याला औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर येथून मोफत मिळणार आहेत.  मानसिक आरोग्यावर उपचारासाठी असणारी औषधे ही खूप महागडी असलेने जनतेने सदरील शिबिराचा लाभ घ्यावा. ज्यांना मानसिक आरोग्याची लक्षणे आहेत किंवा ज्यांची अगोदरच एखाद्या रुग्णालयात उपचार चालू आहे अशा सर्व रुग्णांनी सदरील मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोगी कल्याण समिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे अध्यक्ष तथा जि. प. सदस्य  सचिन बल्लाळ,  बबनराव देसाई (पंचायत समिती सदस्य), डॉ. आर. के. खोत (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ.  बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment