बागिलगे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2021

बागिलगे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बागिलगे (ता. चंदगड) येथे राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील यांचा सत्कार करताना बाबुराव वरपे, बाजूला सरपंच नरसु पाटील, एस के पाटील,दयानंद पाटील आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    बागिलगे (ता. चंदगड) येथे सरस्वती फौंडेशन ,स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांचेवतीने चंदगड तालुक्यातील स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

         या शिबीराला राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील यांनी  मार्गदर्शन केले. यांमध्ये स्पर्धा परिक्षेतील विविध पदे, अभ्यासक्रम व परिक्षा स्वरुप, मार्गदर्शक पुस्तके, अभ्यास पद्धत, नोटस्, स्पर्धा परिक्षा तंञ, पेपर सोडविणेचे कौशल्य, मुलाखत व व्यक्तिमत्व तयारी,यशस्वी होणेचे तंञ. या बाबीवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नांना तितकेचं समर्पक उत्तर देवून त्यांना स्पर्धा परिक्षेसाठी प्रेरित केले. यावेळी सरस्वती फौंडेशनच्या संचालिका  सौ. श्वेता गोपाााळ पाटील, सरपंच नरसू सटूप्पा पाटील, उपसरपंच सौ. अनुसया भुजंग पाटील, ग्रा. पं. सदस्या सौ. माया रामा पाटील, रामू पाटील, पोलिस पाटील  प्रकाश पाटील,  डी. बी. पाटील, जी. एस. पाटील, एस. के. पाटील यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षकवृंद व  विद्यार्थी उपस्थित होते. 

         चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्याठी मार्गदर्शन शिबिराचे मोफत आयोजन केल्याबद्दल बाबुराव वरपे (डुक्करवाडी) यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला. दिवसभराच्या या मार्गदर्शन शिबीरासाठी चंदगड तालुक्याच्या विविध भागांतून ३०० विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment