कानुर खुर्द येथील २० फुटी नरकासुराची प्रतिकृती घेतेय बाजारपेठेचे लक्ष वेधून - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2021

कानुर खुर्द येथील २० फुटी नरकासुराची प्रतिकृती घेतेय बाजारपेठेचे लक्ष वेधून

कानुर खुर्द येथे मुलांनी तयार केलेला नरकासुर


चंदगड / प्रतिनिधी

       नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका खूप प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते, असे मानतात. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. याचे औचित्य साधून कानूर खुर्द गावामध्ये गेले कित्येक वर्षांपासून नरक चतुदर्शी साजरी केली जाते. या सणाचे औच्यीत साधून गावामध्ये तरुण मुलांनी २० फुटाचा नरकासुर बनवला आहे. २० फुटाचा नरकासुर फक्त कागदा पासून बनवला आहे. बनवण्यासाठी आठ दिवसांची मेहनत लागली आहे. २० मुलांनी अगदी मेहनतीने बनवले आहे. हि नरकासुराची प्रतिकृती बाजारपेठेचे लक्ष वेधून घेत आहे. 

        असं म्हणतात की, नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते. हेच रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने स्नान केले होते. तेव्हापासूनचं त्यादिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा सुरु झाली. नरकासुराच्या वधानंतर त्याची आई भूदेवी म्हणजेच पृथ्वी हिने घोषणा केली की त्यांचा मृत्यूवर शोक करू नये तर त्याच्या मृत्यूला एखाद्या उत्सवाप्रमाणे आनंदाने साजरा करावे. नरक चतुर्दशीचा सण आपल्याला हा संदेश देतो की, या संपूर्ण समाजाचा चांगुलपणा कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा नेहमी प्रबळ असतो.

No comments:

Post a Comment