स्वामीकार रणजीत देसाई यांच्या 'बारी' कादंबरीवर महानाट्याची निर्मिती - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2021

स्वामीकार रणजीत देसाई यांच्या 'बारी' कादंबरीवर महानाट्याची निर्मिती

स्वामीकार रणजीत देसाई 
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        स्वामीकार, पद्मश्री रणजित देसाई यांची एकेकाळी तुफान गाजलेली कादंबरी 'बारी' लवकरच महानाट्याच्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे.

      चंदगड तालुक्यातील मुंबई परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या कलाकार तरुणांनी स्थापन केलेल्या 'नाट्यसंस्कार' बॅनरखाली या महानाट्याची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई स्थित चंदगड तालुक्यातील कलाकारांनाच यात अभिनयाची संधी मिळणार आहे. 'बारी' कादंबरीवरून 'सबूद' नाटकाचे लेखन सन्ना मोरे यांनी केले आहे. निर्माता शिवाजी विष्णू पाटील व संजय पाटील तर दिग्दर्शनाची जबाबदारी जीवन कुंभार यांनी सांभाळली आहे.

         कृष्णा बामणे व विष्णू पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या नाट्यरूपांतरास रणजीत देसाईंच्या कन्या पारू नाईक, मधूमती शिंदे, नातू गौरव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नाटकाचा मुहूर्त लवकरच मुंबई येथे संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment