मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी मंदिरात पुजा - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी मंदिरात पुजा

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी महागावातील मरगुबाई मंदिरात पूजा करताना शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ

महागाव : सी. एल. वृत्तसेवा

           महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शत्रकिया यशस्वी झाली आहे. तरीही त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत व्हावी यासाठी महागाव (ता. गडहिंग्लज) येथील मरगुबाई मंदिरात शिवसैनिक व ग्रामस्थ यांच्या वतीने पूजा करून देवीला साकडे घालण्यात आले. यावेळी गडहिंग्लज तालुका सहकार सेना संघटक अखलाकभाई मुजावर, पांडूरंग चौगुले मामा, श्रीकांत मांगले, भैरू शिंदे, नाना कागिनकर, नाना महंत, राम शिंत्रे, श्री. शिंदे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment