कडलगे बुद्रूक येथे माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या २६ वर्षापूर्वीच्या आठवणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2021

कडलगे बुद्रूक येथे माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या २६ वर्षापूर्वीच्या आठवणी

कडलगे बुद्रुक (ता. चंदगड)  मराठी विद्यामंदिर शाळेत १९९४-१९९५ मध्ये सातवीत शिकणार्‍या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यी.

माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

         कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील मराठी विद्यामंदिर शाळेत १९९४-१९९५ मध्ये सातवीत शिकणार्‍या माजी  विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी २६ वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अध्यक्षस्थानी भ. पु.  पाटील होते.

              प्रारंभी दीपप्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  वसंत जोशीलकर यांनी प्राथमिक शाळा इमारत बांधताना आणि सांस्कृतिक कार्यक्रम करताना आलेले अनुभवकथन केले. यावेळी उपस्थित शिक्षकांचा  सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून करण्यात आला. विद्यार्थ्यांचाही  त्यांच्या कुटुंबासह पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.  दशरथ देसाई (निंगुडगे), चंदशेखर पाटील (उत्तूर) यांनी त्या काळातील शाळा व गावातील आठवणी जागवल्या. विजय कांबळे,  अनंत पाटील, सुजाता पाटील व सुरेखा बुवा या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. वैजनाथ देसाई, मुकेश हुद्दार, के. एन पाटील,  डी. आय. पाटील, सुधा पाटील, कै. एम. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी वर्गमित्रांतर्फे शाळेला भेटवस्तू देण्यात आली. देशसेवा करणार्‍या चार जवानांचाही सन्मान करण्यात आला. कार्यकमाचे आयोजन  प्रल्हाद पवार व अनंत शि. पाटील यांनी केले होते.  सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी तर आभार सुधा हारकारे यांनी मानले. या मेळाव्यात ३५ विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment