अत्याधुनिक रुग्णांलयासाठी रविवारी पाटणे फाटा येथे सर्वपक्षीय बैठक - प्रा. सुनिल शिंत्रे यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2021

अत्याधुनिक रुग्णांलयासाठी रविवारी पाटणे फाटा येथे सर्वपक्षीय बैठक - प्रा. सुनिल शिंत्रे यांची माहीतीचंदगड / प्रतिनिधी

         चंदगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्याच्या एका टोकाला वसलेला दुर्गम आणि डोंगराळ तालुका आहे. या निसर्गसंपन्न तालुक्यात आरोग्य विषयक अत्याधुनिक आणि अत्यावश्यक सोयी सुविधांचा अभाव आहे. कोरोना महामारीच्या काळात त्याची गांभीर्याने जाणीव झाली. या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा देणारे रुग्णालय असावे हा हेतू घेऊन एक लोक चळवळ उभा करीत आहोत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. १४) दुपारी साडेतीन वाजता व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालय पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बैठक आयोजित केली आहे. तालुक्यातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते, हितचिंतकांनी या बैठकीला उपस्थित राहून आपल्या विचारांचे योगदान द्यावे असे आवाहन प्रा. सुनिल शिंंत्रे यांनी केले आहे. No comments:

Post a Comment