विधान परिषदेत अमल महाडिकांचा विजय निश्चित, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा, इचलकरंजी येथे मेेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

विधान परिषदेत अमल महाडिकांचा विजय निश्चित, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा, इचलकरंजी येथे मेेळावा

चंद्रकांतदादा पाटील

इचलकरंजी / सी. एल. वृत्तसेवा

        विधान परिषदेच्या निवडणूकीसत भाजपाचे अमल महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते इचलकरंजी येथे विधान परिषदेचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या आवाडे गटाच्या मेळाव्यावेळी ते बोलत होते.

          श्री पाटील म्हणाले की, आमचे विरोधी उमेदवार सतेज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याकडे २७० च्या आसपास मतदार असल्याचा दावा केला आहे. हा दावा पोकळ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येकजण निवडणुकीपूर्वी आपणच जिंकणार असा दावा करतच असतो,त्यामुळे सतेज पाटील यानी सुद्धा २७० ऐवजी ४१६ मताने निवडूण येणारा दावाही केला असेल असा टोलाही त्यांनी लगावला.  केवळ काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक आलेले ३५ जण आहेत. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र केली तर त्यांचा आकडा ११८ वर पोहोचतो.जर भाजपचा विचार केला तर फक्त भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक आलेले १०५ आहेत. त्यात जर विनय कोरेंच्या जनसुराज्य आणि आवाडे यांच्या ताराराणी आघाडीची मते जोडली तर ती १६५ होतात. त्यामुळे त्यांच्यापेक्षाही अधिक मते आपल्याकडे आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी पुढे आणखी जेवढी मते लागणार आहेत आणि ती कोण घेणार ? यावर ही निवडणूक अवलंबून असल्याचे पाटील म्हणाले. २०८ मते मिळविणारे निवडणुकीत जिंकणार आहेत. मात्र, आम्हाला आता १६५ च्या वर केवळ ४३ इतकीच मते मिळवायची आहेत. मात्र, ही ४३ च्या मते आम्ही कशी मिळवणार हे आम्ही आता सांगणार नाही. या निवडणुकीत अमल महाडिकांचा विजय होणार याबाबत कोणतीही शंका नसल्याचा दावाही पाटील यांनी केला.

No comments:

Post a Comment