चंदगड तालुकातुन सर्वधिक मतदान देऊ- आम राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

चंदगड तालुकातुन सर्वधिक मतदान देऊ- आम राजेश पाटील

चंदगड येथे विधान परिषेदेचे उमेदवार सतेज पाटील यांच्या समवेत गोपाळराव पाटील,विजय देवणे,ॲड.अनंत कांबळे,संग्रामसिह नलावडे, विद्याधर गुरबे, प्रभाकर खाडेकर, अंजनाताई रेडेकर, विक्रम चव्हाण-पाटील, कल्लाप्पा भोगण व नगरसेवक 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

महाविकास आघाडीचे विधानपरिषदेचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी आम्ही एकदिलाने खंबीरपणे उभे राहू तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक यांचे सर्वधिक मतदान सतेज पाटील यांना देणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. आज चंदगड येथे महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर विधानपरिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंदगडमधील महाविकास आघाडीच्या सर्व मतदारांची आज भेट घेतली. यावेळी नगराध्यक्षा प्राची कणेकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे स्वागत करून चंदगड नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांचे तसेच सभापती कडून एक दिलाने तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली.

 यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते गोपाळराव पाटील म्हणाले की, पालकमंत्री सतेज पाटील यांनी तालुक्याला जास्ती जास्त निधी दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वजण त्यांच्या पाठीशी राहतील. नगरपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी या पद्धतीने आम्हाला मदत केली. त्या मदतीची उतराई करण्यासाठी आम्ही सर्वजण विधान परिषदला तुमच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. तर तालुक्यातील काही प्रश्न मांडत चंदगडचे सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी जास्तीत - जास्त मतांनी निवडून आणूया असे यावेळी सांगितले. 

चंदगड तालुका हा चांगल्या गोष्टीच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभा राहतो, आताही राहील असे सांगितले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी बोलताना सांगितले की जिल्ह्यात महा विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या बरोबर विरोधी नगरसेवकांना आज पर्यंत आम्ही निधी मध्ये कुठलाही दुजाभाव केला नसल्याचं सांगितलं तर नगरोत्थान तसेच विविध माध्यमातून विविध माध्यमातून नगर पंचायतींना भरीव निधी देऊ असे सांगितले.

आमदार राजेश पाटील यांनी चंदगड तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य व नगर सेवक एक दिलाने एका विश्वासाने सतेज पाटील यांच्या सोबत राहतील. भविष्यात चंदगड सारख्या दुर्गम भागाचा विकास कामांची मदत ही सतेज पाटलांच्या कडून होईल. त्यामुळे आम्ही सर्वजण महाविकास आघाडीची ताकद पाटील यांच्या पाठीशी राहू असे सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर, सभापती ॲड. अनंत कांबळे, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, संग्रामसिह नलावडे, विद्याधर गुरबे, प्रभाकर खांडेकर, अंजनाताई रेडेकर, विक्रम चव्हाण-पाटील, विशाल पाटील, कल्लाप्पा भोगण, विलास पाटील, अरूण सुतार, आनंद हळदणकर, अभिजित गुरुबे, रोहित वाटंगी, मेहताब नाईक, झाकीर नाईक, शिवानंद हुंबरवाडी, सौ. संजीवनी चंदगडकर, सौ. नेत्रदीपा कांबळे, सौ. अनिता परीट, सौ. अनुसया दाणी, सौ. माधुरी कुंभार, मुमताजबी मदार, संभाजीराव देसाई व पदाधिकारी उपस्थिती होते.

कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्यावतीने जो कोणी उमेदवार देईल तो उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा असेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोल्हापुरी हिसका निवडणुकीच्या रूपाने दाखवण्याची वेळ आली आहे. चंदगड आजरा गडहिग्लज या भागातून जास्तीत जास्त मताधिक्य सतेज पाटील यांना देऊन पुरोगामी कोल्हापूरकरांचा वारसा जपूया असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment