एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला चंदगड भाजपचा पाठिंबा, आक्रमक पवित्रा घेत बसेस आगारांमध्ये पाठवल्या परत - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला चंदगड भाजपचा पाठिंबा, आक्रमक पवित्रा घेत बसेस आगारांमध्ये पाठवल्या परत

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         एस. टी. कर्मचारी यांच्या आंदोलनाला पांठीबा देण्यासाठी आज शुक्रवारी भाजपा चंदगड तालुका सरचिटणीस भावकु गुरव व चिटणीस भरमू पाटील यांनी चंदगड आगारात आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी संपुर्ण राज्यात एसटी ठप्प असताना चंदगड आगारातून एसटीच्या दोन फेऱ्या सोडल्याबद्दल भावकु गुरव यांनी आगारप्रमुख यांना धारेवर धरले. सोडण्यात आलेल्या बसेस रविद्र बांदिवडेकर व कार्यकर्ते यांनी नागणवाडी येथे अडवून त्या परत आगारात पाठवल्या. कर्मचारी करत असलेल्या आंदोलनाला पांठीबा देत प्रसंगी चंदगड तालुका भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरायला मागे पडणार नाहीत. अशी ग्वाही भावकु गुरव व पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिली.No comments:

Post a Comment