र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा बजाज फिन्सर्व लिमीटेड कंपनीशी सामंज्यस करार - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा बजाज फिन्सर्व लिमीटेड कंपनीशी सामंज्यस करार

चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          नोकरी देणारे आणि नोकरी घेणारे यातील वाढती तफावत आणि त्यातून वाढत जाणारी ग्रामिण पदवीधरांची बेकारी विचारात घेऊन नोकरी देणा - या कंपन्यांना अपेक्षित कौशल्यधारीत युवकांची उपलब्धता करण्यासाठी कौशल्य व उद्योजकता विकास आणि रोजगार क्षमता ( Skill & Entrepreneurship Development & Employability ) बाबत विविध उपक्रम राबविण्यासाठी चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयाने बजाज फिन्सर्व कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. 

       या कराराच्या लिखीत दस्त विनिमय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर . पाटील होते. कंपनीचे प्रमुख प्रशिक्षक (Lead Trainer) डॉ. आमित याळगी यांनी कंपनीचा CSR फंड ग्रामीण आणि वंचीत भागातील पदवीधर युवक व युवतीना वेगवेगळया प्रकारची कौशल्ये विकसित करण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे चंदगड सारख्या दुर्गम आणि औद्योगिक दृष्टया मागास भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्याची संधी या महाविद्यालयाने दिल्याबददल प्राचार्यांचे अभिनंदन करून एकूण या कराराचे विविद्या फायदे स्पष्ट केले. तर अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील म्हणाले बजाज फिन्सर्व कंपनीने पदवीधर युवकांच्या सर्वकंश विकासाबरोबर कार्पोरेट कौशल्य विकसीत करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाशी सामंजस्य करार केल्याबददल कंपनी पदाधिकाऱ्यांन  धन्यवाद दिले. प्रारंभी वाणिज्य विभाग प्रमुख व कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. एस. डी. गोरल यांनी या सामंजस्य कराराचा हेतू विशद केला. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, प्राद्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा. ए. डी. कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment