अडकूर येथे भात, नाचना आधारभूत केंद्र सूरू, नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

अडकूर येथे भात, नाचना आधारभूत केंद्र सूरू, नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आवाहन


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         अडकूर (ता. चंदगड) येथे केंद्र व राज्य शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत चंदगड तालुका कृषिमाल फलोत्पादन ख. वि. संघ दाटे यांचे मार्फत २०२१ /२२ या हंगामातील शेतकऱ्यांनी पिकवलेले भात व नाचणी खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली नावे मल्हार कृषि सेवा केंद्र, अडकुर येथे नोंद करावित असे आवाहन फलोत्पादन संघाचे अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांनी केले आहे. नाव नोंद करतेवेळी शेतकऱ्यांनी चालू हंगामातील म्हणजे २०२१|२२ मध्ये भात व नाचणी पिकाची नोंद असलेला ७|१२ व८/अ उतारा,आधार कार्ड, बँक पास बुकाची  झेरॉक्स देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी  शेतकऱ्यांनी या भ्रमणध्वनीवर ९१४६०८११२० संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment