माणगाव येथे लोककलाकारांना सांस्कृतिक भवनासाठी जागा द्या, लोककलाकार संघटनेची तहसीलदार यांचेकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

माणगाव येथे लोककलाकारांना सांस्कृतिक भवनासाठी जागा द्या, लोककलाकार संघटनेची तहसीलदार यांचेकडे मागणी

सांस्कृतिक भवनाच्या मागणीसाठी निवेदन देताना लोककलाकार

माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगडसारख्या दुर्गम तालुक्यातील लोककलाकारांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक भवनची आवश्यकता आहे. या सांस्कृतिक भवनासमोर माणगाव ता.चंदगड येथे जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ चंदगड तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

      चंदगड तालुक्यात सांस्कृतीक कार्यक्रम करणेसाठी अथवा लोक कलाकाराना सराव करण्यासाठी सांस्कृतिक भवनाची  गरज आहे.सांप्रदायीक भजन, गोंधळगीते, सनईवादक, शाहीर, वाग्या-मुरळी, धनगरी ओव्या, गजनृत्य, गण गौळण, भारूड, ओव्या, तमाशा, लावणी, हालगी, लेझीम, दांडपटटा, सांप्रदायिक किर्तन, हरीपाठ, डवरी, रेणूका गिते, नाटयकला इत्यादी अनेक पारंपारीक लोककलांना वाव देणेसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणेसाठी तालुक्याच्या ठिकाणी सांस्कृतीक भवन होणे गरजेचे आहे.यासाठी माणगाव गावठाण क्षेत्रातील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर जिल्हा संघटक रघूनाथ कांबळे, चंद्रकांत बागडी, रामदास बागडी,विजय कांबळे, रामा पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment