अथर्व-दौलत कारखान्याच्या वाहनांना रिप्लेक्टर बसविणेत बाबतचा कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

अथर्व-दौलत कारखान्याच्या वाहनांना रिप्लेक्टर बसविणेत बाबतचा कार्यक्रम संपन्न

अथर्व कंपनीचे संचालक पृथ्वीराज खोराटे, सेक्रेटरी अनिल काटे, शेती अधिकारी सदाशिव गदळे, सेक्युरिटी ऑफिसर मोहन मस्के, केनयाई सुपरवायझर पी. डी. सरवदे व वाहन धारक, वाहन चालक


चंदगड / प्रतिनिधी

        अथर्व इंटरट्रेड प्रा.लि, लिज्ड युनिट दौलत साखर कारखाना साईटवरती आज (दि. 19) रोजी सकाळी दहा वाजता पोलिस निरिक्षक बी. ए. तळेकर, कोल्हापूर मोटर वाहन निरीक्षक रमेश सातपूते व श्री. गणेशकर, उपनिरीक्षक यांचे शुभहस्ते उपस्थितीत वाहनांना रिप्लेक्टर बसविणेचा कार्यक्रम पार पडला. 

       याप्रसंगी अथर्व कंपनीचे संचालक पृथ्वीराज खोराटे, सेक्रेटरी अनिल काटे, शेती अधिकारी सदाशिव गदळे, सेक्युरिटी ऑफिसर मोहन मस्के, केनयाई सुपरवायझर पी. डी. सरवदे व वाहन धारक, वाहन चालक उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक तळेकरसो व मोटन वाहन निरीक्षक श्री. सातपूतेसो यांनी वाहन धारकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वाहनाचे पेपर लायसेन्स, आर. सी. बुक, इन्शुरन्स इत्यादी वाहन ड्रायव्हर यांनी दारु पिऊन वाहन चालवु नये, रस्त्यावरून वाहन चालवत असतांना वाहतुकीस अडचण होऊन अपघात होणार याची दक्षता घ्यावी. वाहनामध्ये लाऊड स्पिकर मोठयाने लाऊ नये तसे केल्यास दंडात्मक कारवाई करणेत येईल असे सांगितले. कर्नाटक मधील वाहनांनी सिझन कालावधीसाठी आवश्यक परवाने घ्यावेत. याबाबतच्या सर्व सुचनांचे पालन करुन पोलिस व आर. टी. ओ. ला सहकार्य करावे. कारखान्याने अमंलबजावणीसाठी उपाययोजना करावी. रस्त्यावरील अपघात टाळणेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 

No comments:

Post a Comment