दौलत-अथर्व ची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2021

दौलत-अथर्व ची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा


चंदगड / प्रतिनिधी 

 हलकर्णी ता.चंदगड येथील अर्थव इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत साखर कारखान्याने ३१ऑकटोबर पर्यंत गाळप केलेल्या उसाची बिले प्रतिटन २९०१रूपये प्रमाणे शेतकऱच्या बॅक खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्व चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. 

    अर्थव (दौलत) साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगामात सुरळीतपणे सुरु असून आज अखेर साधारण १ लाख मे.टन उसाचे गाळप पूर्ण होत झाले आहे.  कारखानाला गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता  जमा झाला आहे. यापूर्वी ही कारखान्याने ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची बिले वेळेत दिली असून त्याची परंपरा कायम ठेवली आहे. ऊस बिले वेळेत व चांगल्या दराने दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण  आहे. यापुढेही ऊस बिले वेळेत  दिली जातील,त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस दौलत-अथर्व ला पाठवावा असे आवाहन श्री खोराटे यांनी केले आहे.No comments:

Post a Comment