तेऊरवाडी तंटामुक्त अध्यक्षपदी जे. एम. पाटील, उपाध्यक्षपदी दत्तात्रय पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2021

तेऊरवाडी तंटामुक्त अध्यक्षपदी जे. एम. पाटील, उपाध्यक्षपदी दत्तात्रय पाटील

जे. एम. पाटील                                        दत्तात्रय पाटील


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         तेऊरवाडी (ता. चंदगड) गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहा. फौजदार जे. एम. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय तुकाराम पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

   महाराष्ट्राच्या पोलिस दलात केलेल्या कामाच्या अनुभवाचा उपयोग तंटामुक्ती साठी करणार आहे. ग्रामस्थानी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जे. एम. पाटील यांनी यावेळी बोलताना केले. या निवडीवेळी सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार, उपसरपंच सौ. शालन पाटील, ग्राम पंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment