डॉ. अनिल देशपांडे किशोर भुसारी |
आजरा / सी. एल. वृत्तसेवा
आजरा येथील दि आजरा अर्बन को. ऑप. बँक लि. आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल माधवराव देशपांडे तर उपाध्यक्षपदी किशोर काशिनाथ भुसारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक सादळे होते.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद गंभीर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षपदासाठी डॉ. अनिल माधवराव देशपांडे व उपाध्यक्षपदासाठी किशोर काशिनाथ भुसारी यांचे नाव अशोक चराटी यांनी सुचवले. त्याला सुरेश डांग व श्रीमती शैला टोपले यांनी अनुमोदन दिले. यावेळी आण्णा भाऊ समूह संस्थाचे प्रमुख व बँकेचे ज्येष्ठ संचालक अशोक चराटी त्यांनी बँकेचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष व संचालकांनी बँकेच्या प्रगतीचा व ग्राहकाभिमुख जलद सेवा देण्याच्या दृष्टीने एकमेकांना विश्वासात घेऊन कामकाज करावे व सहकार क्षेत्रात बँकेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. नूतन अध्यक्ष श्री. देशपांडे यांनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने अण्णाभाऊ व त्यांच्या संस्थापक सहकाऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगून बँकेला शेडूल दर्जा प्राप्त करुन देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष श्री. भुसारी यांनी संचालकांनी सोपवलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही दिली. तसेच माजी अध्यक्ष सुरेश डांग, उपाध्यक्ष श्रीमती शैला टोपले यांनी संचालक मंडळाने बँकेची प्रगती करण्यासाठी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी संचालक विलास नाईक, प्रकाश वाटवे, दीपक सातोसकर, रमेश करूनकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, अस्मिता सबनीस, सुनील मगदूम, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment