कालकुंद्री ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2021

कालकुंद्री ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामांचा शुभारंभ

विकास कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कालकुंद्री (ता. चंदगड) ग्रामपंचायत मार्फत चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून गावात विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यात १४ व्या वित्त आयोगातून महिला बचत भवन इमारत बांधणे ४ लाख ३८ हजार, १५ व्या वित्त आयोगातून गावातील आरसीसी गटर्स बांधणे ३ लाख ५० हजार, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती १ लाख ४८ हजार, ग्रामपंचायत कार्यालय जिना बांधकाम ४३ हजार या कामांचा समावेश आहे. शुभारंभ झालेली सर्व कामे सहा महिन्याच्या आत पूर्ण करण्याची आहेत. या प्रसंगी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, एम जे पाटील, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष शंकर कोले, अशोक पाटील, ईश्वर वरपे, दिनकर पाटील, आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व ठेकेदार उपस्थित होते. आभार ग्रामसेवक डी एम नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment