'राष्ट्रीय शिक्षण दिन' निमित्त प्रचलित शिक्षणाचा वेध घेणारी प्रा. डॉ. खाडे यांची कविता- 'शिक्षण' - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2021

'राष्ट्रीय शिक्षण दिन' निमित्त प्रचलित शिक्षणाचा वेध घेणारी प्रा. डॉ. खाडे यांची कविता- 'शिक्षण'

 

डॉ. बी. जी. खाडे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      आज ११ नोव्हेंबर २०२१ 'राष्ट्रीय शिक्षण दिन'. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री 'भारतरत्न' मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस २००८ पासून 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो. मौलाना आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमोल आहे. यासाठी त्यांना १९९२ मध्ये 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. आझाद यांचे पूर्ण नाव - मौलाना सैयद अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन अहमद बिन खैरुद्दीन अल-हुसैन असे होते.

      स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले. मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. या राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथील प्राध्यापक डॉ. बी. जी. खाडे (कागणी, ता. चंदगड) यांनी लिहिलेल्या 'शिक्षण' या कवितेतून शिक्षण कसे असावे कसे नसावे याचा वेध घेतला आहे. आजच्या शिक्षण दिनाचे औचित्य साधून सी. एल. न्यूजच्या वाचकांसाठी सादर करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment