अर्जुनवाडी येथे माजी विध्यार्थी संघटनेचे उदघाटन सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2021

अर्जुनवाडी येथे माजी विध्यार्थी संघटनेचे उदघाटन सोहळा संपन्न

अर्जुनवाडी येथे माजी विध्यार्थी संघटनेचे उदघाटन सोहळ्यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यी.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      विद्या मंदिर अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील  मराठी विद्या मंदीर शाळेतील माजी विध्यार्थी मेळावा व माजी विध्यार्थी संघटनेचा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

      माजी विध्यार्थी संघटनेच्या उद्घाटन सोहळा कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. देसाई  होत्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कृष्णा पाटील व अक्षय पाटील यांनी केले. संघटनेच्या उद्घाटन समारंभी फलक अनावरण उपस्थित सर्व माजी विध्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.

   या कार्यक्रमात श्री. दळवी  यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विध्यार्थिनी यांनी स्वागतगीत, लेझिम नृत्य, शेतकरी नृत्य, नाटिका इत्यादी  छान प्रकारे सादर केल्या. माजी विध्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी परशराम पाटील, उपाध्यक्षपदी फुलाजी शिखरे तर सचिव पदी अनिकेत पाटील यांची निवड करण्यात आली.

   या कार्यक्रमासाठी शिक्षक मटकर, कोळी, पाटील तसेच सरपंच शामराव नाईक, पोलीस पाटील अशोक पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर मंडलिक, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, अंगणवाडी सेविका सुगंधा पाटील, सर्व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच संघटनेमार्फत अंकुश पाटील, रविंद्र पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, मनोहर पाटील, विक्रम पाटील, विनायक नाईक, महेश पाटील, सुधाकर पाटील, उमेश पाटील, अजिंक्य पाटील, महेंद्र नाईक, रेश्मा पाटील व दयानंद पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम च्या शेवटी शाळेचे उपमुख्याध्यापक  मटकर  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment