मोर्ले ते पारगड किल्ला मार्गे चोरट्या दारू वाहतूकीचा सुळसुळाट, सुसाट वाहनांच्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2021

मोर्ले ते पारगड किल्ला मार्गे चोरट्या दारू वाहतूकीचा सुळसुळाट, सुसाट वाहनांच्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात


दोडामार्ग : सी. एल. न्यूज प्रतिनिधी

       गेल्या काही महिन्यांपासून मोर्ले ते पारगड किल्ला मार्गावरुन गोवा बनावटीची लाखों रुपये किंमतीची दारू दिवस रात्र वाहतूक केली जात आहे. दारु वाहतूक  करणाऱ्या सुसाट वाहनांमुळे मार्गावरील ग्रामस्थ व लहान मुलांचा जीव धोक्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व दोडामार्ग पोलिसांनी या ठिकाणी खास पथक तैनात  करुन बेकायदा दारू वाहतूकीला आळा घालावा. अशी मागणी भाजपचे बुथ प्रमुख ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी केली आहे.

          पावसाळ्यात बंद असलेला मोर्ले ते किल्ले पारगड रस्ता आता खुला झाला आहे. लाकुड वाहतूक करण्यासाठी काहींनी जेसीबी मशीनद्वारे रस्त्याची डागडुजी केली आहे. त्यामुळे दारू तस्करांचे आयतेच फावले आहे. या रस्त्त्यावर कुठेही पोलिस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नाहीत. तिलारी घाटातून जायचं तर विजघर चेक पोस्ट आहे. मात्र पारगड मार्गे मोकळे रान मिळाले आहे. दिवसा दुचाकी तर रात्री चारचाकी वाहनातून होत असलेली ही दारू वाहतूक चंदगड, कोल्हापूर, बेळगाव, आजरा परिसरात जात असल्याची चर्चा आहे. तथापि इकडे डोळेझाक होत असल्याच्या तक्रारी वाढल्याचे ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी सांगितले.    

No comments:

Post a Comment