रेल्वेत नोकरीच्या अमिषाने तरुणांची १८ लाखांची फसवणूक, बंटी - बबलीची करामत - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2021

रेल्वेत नोकरीच्या अमिषाने तरुणांची १८ लाखांची फसवणूक, बंटी - बबलीची करामत


नेसरी / एस. के. पाटील

      भारतीय रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नेसरी परिसरातील दोघांना १८ लाख ८ हजार ९९६ रुपयांचा  गंडा घालणाऱ्या शिप्पूर तर्फ नेसरी येथील दोघा पती - पत्नी विरोधात नेसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

           नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक गरजूवंतांची फसवणूक करणारी बंटी आणि बबलीची जोडी सध्या नेसरी भागात वावरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या जोडीच्या कारनाम्याचे अनेकजन शिकारही झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात  संजीवनी प्रभाकर कांबळे उर्फ संजीवनी निलेश पाटणे (सध्या राहणार पुणे) व प्रभाकर जिवबा कांबळे (दोघेही  शिपुर तर्फे नेसरी) या बंटी-बबली विरोधात नेसरी   पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या जोडीने ग्रामिण  भागातील तरुणांना नोकरीच्या अमिशाने लाखो रुपयांचा चुना लावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

         याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, संजीवनी प्रभाकर कांबळे उर्फ संजीवनी निलेश पाटणे व प्रभाकर जिवबा कांबळे दोघेही राहणार शिप्पूर तर्फ नेसरी  या बंटी-बबलीच्या जोडीने आपल्या घरी येऊन तुला रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावतो असे सांगून 1 जानेवारी 2016 पासून 3 मे 2021 पर्यंत 11 लाख ५९ हजार रुपये रोख व बँक ट्रान्सफरद्वारे घेवून फसवणूक केल्याची फिर्याद नेसरी पोलिसात गोपाळ विठ्ठल टिक्का (वय- ३०, रा. हेळेवाडी, ता. गडहिंग्लज) यांनी दाखल केली आहे. 

         तसेच स्वप्निल विजय पाटील (वय २८) या हेळेवाडीच्या तरुणास देखिल रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावतो. अशी बतावणी करून संजीवनी कांबळे व तिचा नवरा प्रभाकर कांबळे या दोघांनी ६ लाख ४९ हजार ९९६  रुपये रोख रक्कम घेऊन  नोकरी न लावूताच फसवणुक केली असल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आणखी किती लोकांना या बंटी-बबली जोडीने फुस लावून लुबाडले आहे की नाही हे तपासाअंती समोर येईल.

         त्यानुसार नेसरी पोलिस ठाण्यात कलम 420, 34 प्रमाणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संजीवणीला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास पो. नि. अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस  हे. कॉ. माने तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment