अथर्व-दौलतच्या वाहनांना रिप्लेक्टर बसविताना मान्यवर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता.चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. लिज्ड युनिट दौलत साखर कारखान्याला या गळीत हंगामात चंदगड तालुक्यासह कर्नाटक व बाहेरुनही मोठ्या प्रमाणात ऊस वहातूक सूरू आहे.त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाना रिप्लेक्टर बसवणेत आली. यावेळी मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरचे मोटर वाहन निरीक्षक रजनिकांत पाटील व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक वैभव तोरणे यांनी भेट देवून ऊस वाहतुक वाहन चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वाहनाचे पेपर (आर. सी. बुक), लायसेन्स, इन्शुरन्स इत्यादी कागदपत्रांची सर्व वाहनधारकांनी पुर्तता केलेली असावी. वाहनाच्या ड्रायव्हरने मद्यपान करुन वाहन चालवु नये, रस्त्यावरून वाहन चालवत असतांना वाहतुकीस अडचण होऊ नये किंवा अपघाताला कारणीभूत ठरू नये याची दक्षता घ्यावी, वाहनामध्ये लाऊड स्पिकर मोठ्याने लावू नये तसे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला. तसेच कर्नाटकमधील वाहनांनी सिझन कालावधीसाठी आवश्यक परवाने घ्यावेत. याबाबतच्या सर्व सुचनांचे पालन करुन आर. टी. ओ. ला सहकार्य करावे. कारखान्याने अंमलबजावणीसाठी उपाययोजना करावी. रस्त्यावरील अपघात टाळणेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अथर्वचे संचालक पृथ्वीराज खोराटे, सचिव अनिल काटे, सुरक्षा अधिकारी मोहन मस्के, शेती विभागाचे कर्मचारी नार्वेकर, जे.टी. पाटील व वाहन चालक-मालक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment