दाखल्यातील खाडाखोडप्रश्नी मांडेदुर्ग ग्रामपंचायतीचा संबंध नाही - पुजारी - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2021

दाखल्यातील खाडाखोडप्रश्नी मांडेदुर्ग ग्रामपंचायतीचा संबंध नाही - पुजारी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील रहीवासी रवळू जिवाना कांबळे व नागोजी तुकाराम पाटील यांच्या मृत्यूचे दाखले ग्रामपंचायतीने योग्य तारखा टाकून दिले होते. मात्र, सेवा संस्थेचे सभासद वाढविण्याच्या हेतूने दाखल्यांवर खाडाखोड करून मृत वारसा ठराव केला असल्याचा संशय आहे. या प्रकरणाशी ग्रामपंचायतीचा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा ग्रामसेवक सुनील पुजारी यांनी केला. 

        यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले. गावातील सेवा संस्थेचा निवडणूक कार्यक्रम लागला असून मतदार यादीतील काही नावांवर विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे. मृत्यूचे दाखले करण्याच्या मुद्यावरून सहकार खात्याकडे तक्रार करण्यात आली. त्यात ग्रामसेवक आणि संगणक ऑपरेटर यांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचा आरोप केला आहे. त्यावर ग्रामसेवक पुजारी यांनी खुलासा केला. ग्रामपंचायतीने दिलेले मूळ दाखले आणि सेवा संस्थेकडे सादर केलेल्या दाखल्यांत तफावत दिसून येते. त्यामुळे त्याची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पुजारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment