ट्रॅव्हल्स मालकांनी मान्य केल्या प्रवाशांच्या मागण्या, १५ डिसेंबर पूर्वी मागण्यांची अंमलबजावणी होणार - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2021

ट्रॅव्हल्स मालकांनी मान्य केल्या प्रवाशांच्या मागण्या, १५ डिसेंबर पूर्वी मागण्यांची अंमलबजावणी होणार

 

चंदगड येथे तहसील कार्यालयात खासगी ट्रॅव्हल्स मालक व प्रवाशी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ॲड.संतोष मळविकर ,बसलेले प्रा. एन एस.पाटील, पवार,फाटक आदी

 चंदगड/प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे) 
      सोमवार पासून चंदगड मध्ये ट्रॅव्हल्स घालणार नाही, गाडीमध्ये तक्रारपेटी लावणार, हॉटेलचे जेवण चांगले नसल्यास हॉटेल बदलणार, रात्री दहा ते अकरा या वेळेत जेवायला गाडी थांबणार, दर पत्रक शासन निर्णयाप्रमाणे घेणार, कर्नाटकातून गाडी जाण्यासाठी योग्य ती चर्चा चे नियमन करणार वेळेत गाड्या ये-जा करणार, बॅग साठी टोकण पद्धत वापरणार, ड्रायव्हर अथवा कंडक्टर विषयी बेशिस्त वर्तन करणार्‍यांची तक्रार असल्यास त्याला काढून टाकणार, गाड्या स्वच्छ पुरवणार आदी मागण्या ट्रॅव्हल्स मालकांनी मान्य केल्या. सर्व मागण्यांची अंमलबजावणी १५डिसेंबर पूर्वी करणार असल्याचे जाहीर केले.
     तहसील कार्यालयात पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, नायब तहसीलदार हेमंत कामत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. चंदगड तालुक्यातून मुंबई, पुणे  येथे खासगी ट्रॅव्हल्स च्या विरोधात प्रवाशांच्या अनेक तक्रारी होत्या,त्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलाविण्यात आली होती.
          यावेळी ॲड.मळविकर यांनी प्रथम प्रवाशांच्या अडचणी व मागण्या मांडल्या  सुरुवातीला ट्रॅव्हल्स मालक व मळवीकर यांच्यात खडाजंगी झाली ,पण वेळेत पोलीस निरीक्षक तळेकर यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. यावेळी केसरकर ट्रॅव्हल्स चे मालक संजय केसरकर ,महालक्ष्मी ट्रॅव्हल्स चे मालक शिवाजी लोकरे, वैभव ट्रॅव्हल्स चे मालक संदीप फडके ,पवन ट्रॅव्हल चे मालक प्रदीप पाटील ,संदेश रायकर ,श्रीलात ट्रॅव्हल्स चे मालक कातकर यांनी आपापल्या भूमिका मांडल्या.  ,भविष्यात प्रवासी वाहतूक संघटना स्थापन करणार असून प्रवाशांना त्रास झाल्यास कठोरात कठोर कारवाईची मागणी सनदशीर मार्गाने करणार असल्याचे ॲड मळविकर यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. एन एस पाटील ,नितीन फाटक ,बापू शिरगावकर ,दीपक माईनकर ,परशुराम पवार ,अनिल गावडे हे उपस्थित होते.


 

No comments:

Post a Comment