हेरे येथील शिक्षक, जुन्यापिढीतील नाट्यदिग्दर्शक लक्ष्मण सुभेदार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2021

हेरे येथील शिक्षक, जुन्यापिढीतील नाट्यदिग्दर्शक लक्ष्मण सुभेदार यांचे निधन

लक्ष्मण सुभेदार

चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे)

      हेरे (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण कृष्णाजी सुभेदार (वय वर्षे ८८) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले.एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कलेच्या क्षेत्रात ही नावलौकिक मिळविला होता. संपूर्ण आयुष्य समाजसेवेला झोकून दिलेले प्रेमळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हेरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, सून, वहिनी, जावई नातवंडे तसेच पनतवंडे असा मोठा परिवार आहे.

         लक्ष्मण सुभेदार हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून १९९५साली निवृत्त झाले होते.त्यांनी सेवेच्या काळात पायी चालत आणि नंतर सायकलवरून प्रवास करत नागवे, इब्राहिमपूर येथे विना मोबदला शिक्षण सेवा दिली. पार्ले, मोटणवाडी कानडेवाडी,सुपे, हेरे, चंदगड, नागावे, कनवी,  कोळींद्रे, तिलारीनगर, मोटणवाडी येथे विद्यार्थ्यांना घडविले. आज त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनामुळे नावारूपाला आलेले आहेत. कै. लक्ष्मण सुभेदार याना शिक्षणाबरोबरच कलेची ही फार आवड होती त्यातूनच त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सामाजिक कौटुंबिक नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी दि्गदर्शित केलेली - शेवटचा वैरी, देव्हारा, भाऊ माझा पाठीराखा, जंगल चा राजा, डाकू मानसिंग ही गाजलेली नाटके आजही प्रेक्षकांच्या आठवणी ताज्या करतात.नाटकाबरोबरच भजने, शिमगा, गणेशो्तस्व आदी कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने भाग असायचा हेरे येथे त्यांच्याच पुढाकाराने सार्वजनिक श्री राम गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. गावातील विट्टल भजनी मंडळाचेही संस्थापक सदस्य होते.त्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन २०१४ साली त्याना राज्यस्तरीय संत रोहिदास जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment