कोवाड- चिंचणे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, अनेक गाड्यांची होतेय घसरगुंडी - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2021

कोवाड- चिंचणे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, अनेक गाड्यांची होतेय घसरगुंडी

कोवाड- चिंचणे रस्त्यावर पसरलेले चिखलाचे साम्राज्य

तेऊरवाडी  / सी .एल. वृत्तसेवा
कोवाड- चिंचणे (ता. चंदगड) या रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खडयामध्ये माती टाकून बुजवण्यात आले. पण दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून घसरगुंडी निर्माण झाली आहे. या निसरड्या चिखिलामध्ये घसरून अनेक दुचाक्या पडत आहेत. संबधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रस्ता वाहतूकीला सुरळीत करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
चिंचणे येथे मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जात आहे. येथील वाळू वाहतूक करणारी वाहने या रस्त्यावरून दिवस -रात्र ये- जा करत असतात. त्याचबरोबर हेमरस कारखाकडील ऊसाची वाहतूक सुद्धा याच रस्त्यावरून होत असते. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची अवजड वाहने येथून जात असल्याने रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. पण हे खड्डे निकृष्ठ मातिने मुजवले होते. त्यात पाऊस पडत असल्याने या प्रत्येक खडयामध्ये चिखलाचे साम्राज निर्माण होऊन रस्ता अत्यंत घसरणीचा बनला आहे. या ठिकाणी दुचाकी घातल्यास ती घसरूण चिखलामध्ये पडत आहे. तर मोठी वाहने घसरून रस्त्याकडेला गेल्याने अपघात  होत आहेत. याची प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी चिंचणे, दुंडगे, कामेवाडीसह वाहनधारकानी केली आहे.

No comments:

Post a Comment